गोळवण येथे महिलाना सौ नीलम राणे यांचे मार्गदर्शन!

मसूरे | प्रतिनिधी : गोळवण शिसेगाळुवाडी येथे आबा चव्हाण यांच्या घरी सौ. नीलम राणे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्याला माजी सभापती सौ. सुमेधा पाताडे, सौ अस्मिता बांदेकर, सौ मसुरकर मॅडम, सौ प्रीती सावंत, सौ सपना पावसकर, व गोळवण गावातील सुमारे 175 महिला व पुरुष उपस्थित होते. विरोधकांच्या भुल थापाना बळी ण पडता निलेश राणे यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटण दाबून गोळवण गावातून जास्तीतजास्त मतदान द्या असे आवाहन सौ नीलम राणे यांनी केले. यावेळी गोळवण सरपंच श्री सुभाष लाड , उपसरपंच श्री शरद मांजरेकर , भाई चिरमुले, गावडे सर, वासुदेव पावसकर , सत्यवान चव्हाण, नामदेव चव्हाण , लक्ष्मण खरात, श्री. सत्यविजय पालव, सौ. रूपा दुखंडे, श्री आप्पा घाडी, श्री नंदू नाईक , इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.