Kankavali Savadav bus accident The accident occurred while saving the vehicle in front
कणकवली : कणकवली ते सावडाव जाणाऱ्या एस. टी. बसचा जानवली – तरंदळे सर्व्हीस रोड वर अपघात झाला. रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनाला बाजू देऊन एस.टी. पुढे जात असताना सर्व्हीस रस्त्याच्या संरक्षक कठड्याला एस.टी. घासली. यात खिडक्या तुटल्या. सुदैवाने कुणीही प्रवासी जखमी झाला नाही. कणकवली शहर तसेच लगतच्या तरंदळे सर्व्हीस रोडवर दोन्ही बाजूंनी चार चारकी वाहने उभी करून ठेवली जातात. आधीच सर्व्हीस रोड कमी रूंदीचा आहे. त्यात वाहने उभी करून ठेवल्याने मोठी वाहने जाण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. दरम्यान कणकवली ते सावडाव अशी एस टी जात असताना लगतच्या वाहनाला बाजू देत एस टी चालकाने गाडी पुढे नेली. यात चालकाकडील बाजू सर्व्हीस रस्त्याच्या संरक्षक कठड्याला तसेच तेथील विद्युत खांबाना जोराने आदळली. यात तीन खिड्क्या तुटल्या. तसेच एस टीचा पत्राही कापला गेला. मात्र या अपघातात प्रवासी सुदैवाने बचावले.