आयनी मेटे मोहल्ल्यातील मारहाणीत तीन जखमी !

खेड(प्रतिनिधी)
खेड :तालुक्यातील आयनी मेटे मोहल्ल्यातील मारहाणीत तीन जखमी झाले आहेत. हि मारहाणीची घटना  २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.
प्रकाश भागोजी जाधव (४४) ., लक्ष्मी प्रकाश जाधव (४०) व दिप्ती प्रकाश जाधव (तीनही रा. आयनी मेटे मोहल्ला,ता. खेड )अशी या तिघां जखमींची नावे आहेत. या घटनेची फिर्याद  २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १:११ वाजता दाखल झाल्यानंतर पोलीसांनी  प्रथमेश एकनाथ जाधव (रा. आयनी मेटे मोहल्ला,ता. खेड) व इतर १२ ते १५ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा  दाखल केला आहे.
              पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी टि.व्ही. बघत असताना फिर्यादी यांचा चुलत भाऊ आरोपी प्रथमेश एकनाथ जाधव व अन्य १२ ते १५ अनोळखी इसम हे फिर्यादी यांच्या घरावर दगडी मारत होते, म्हणून फिर्यादी यांच्या पत्नीने पुढे जावून दरवाजा उघडून पाहिले असता , आरोपी प्रथमेश जाधव याच्या हातात बांबू व त्याच्या सोबतच्या अन्य १२ ते १५ अनोळखी इसम हे फिर्यादी यांच्या घरात हातामध्ये हॉकीस्टिक घेवून शिरले न त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात , उजव्या पायावर आरोपी प्रथमेश जाधव याने बांबूने व त्याच्या मित्रांनी हातातील हॉकीस्टिकने मारहाण केली तसेच शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.