मंडणगड ः प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील मौजे कांट येथी गोठ्यातून अज्ञाताने गाय चोरुन नेली. ही घटना सोमवार 8 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 6 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मौजे कांटे येथे गुरांचा गोठा आहे. त्यामधील 10 वर्षे दोन महिन्यांची काळ्या रंगाची गाभण गाय अज्ञाताने चोरुन नेली. ही बाब सोमवारी सायंकाळी फिर्यादींच्या लक्षात येताच त्यांनी गोठ्याच्या आजबाजुला गायीचा शोध घेतला. परंतू त्यांना आपली गाय कोठेही मिळून न आल्याने त्यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










