राजापूरातील नवरे बंधु उपहारगृहाचे मालक गजानन नवरे यांचे निधन

 

राजापूर (वार्ताहर): शहरातील नवरे बंधु उपहारगृहाचे मालक गजानन उर्फ गजाभाऊ भिकाजी नवरे (७३) यांचे गुरूवार २८ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

गेले अनेक वर्षे ते अर्धांगवायुने आजारी होते. एक शांत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. नवरे बंधु उपहारगृहाच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी स्नेहपूर्ण संबंध होते. शहरानजीकच्या हर्डी गावच्या रहिवासी असलेले गजाभाऊ हे शहरात समर्थनगर भटाळी येथे नवरे बंधु उपहार गृह या व्यवसायाच्या माध्यमातून स्थायिक झाले होते.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसाद, विवाहित मुलगी, जावई, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्यावर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

————————————————————