नाणोस येथील तळीत भली मोठी ‘मगर ‘

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील नाणोस नाणोसकरवाडी येथील शेत तळीत भली मोठी मगर दिसून आली आहे. या ठिकाणी अलीकडेच ब्रीज कम बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने या तळीत मगर निदर्शनास आली आहे. या पूर्वी मळेवाड येथील नदीत मगरीचे वास्तव्य दिसून आले होते. त्यानंतर आता नाणोस येथे मगर दिसून आल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.