नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदस्य के पी राऊळ यांचे निधन

नेमळे । प्रतिनिधी : नेमळे येथील आंबा बागायतदार तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य काशीराम परशुराम उर्फ के. पी. राऊळ (वय ८५, रा. फौजदार वाडी, नेमळे ) यांचे त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री आमच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

 

 

के पी राऊळ यांनी आपल्या जीवन प्रवासात एस टी महामंडळात कंडकटर, नेमळे विकास सेवा सोसायटी चेअरमन, नेमळे कौल उत्पादक संस्थेचे संचालक, तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्य अशी पदे भूषवून त्यांनी चांगली सेवा दिली होती. सहकार,शिक्षण, समाजकारण,राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, तीन मुली, जावई, एक पुतण्या,नातू,नातवंडे असा परिवार आहे. नेमळे गावातील आंबा बागायतदार परशुराम उर्फ बाळा राऊळ, लीलाधर राऊळ यांचे ते वडील होतं.