
पंचायत समिती आणि ग्रा. रुग्णालयाच्या इमारती कामे तातडीने पूर्ण करा- अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
लांजा (प्रतिनिधी) लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी लांजा पंचायत समितीच्या इमारत तसेच ग्रामीण रुग्णालय कामाची पाहणी केली. आणि ही दोन्ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर किरण सामंत यांनी आपल्या कामाची चूणुक दाखवून दिली आहे. निवडणूक आल्यानंतर तातडीने सहाव्या दिवशी लांजा येथे भेट देऊन विविध शासकीय खात्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये जलजीवन, पंचायत समिती, बांधकाम आदी सर्वच प्रमुख शासकीय विभागाच्या खात्यांच्या अधिकारी वर्गाची आढावा बैठक लांजा तहसील कार्यालय येथे घेतली. यावेळी प्रलंबित असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या .
यानंतर आमदार किरण सामंत यांनी लांजा पंचायत समितीच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारत बांधकामाची पाहणी केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना दिल्या. यानंतर त्यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लांजा तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय असल्याने हे रुग्णालय अतिशय योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर या इमारत बांधकामाला सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या .
आमदार किरण सामंत यांच्यासोबत यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे ,त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, यांच्यासह जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी, भाज











