खेड(प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप बालभवन , श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव ( प्राथमिक विभाग), कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर,( उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालांच्या ‘स्नेहगंध २०२४’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी संस्था सदस्य यांच्या उपस्थित करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थाध्यक्ष मा. अरविंद तोडकरी यांनी सर्वांना स्नेह्गंध च्या शुभेच्छा दिल्या व स्वागताध्यक्ष राहुल जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, खजिनदार विनोद बेंडखळे, सरचिटणीस माधव पेठे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, रुपल पाटणे, भडगाव-खोंडे ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे , ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, प्रा. सुजित नगरे, जेष्ठ लिपिक सितारामपंत जामकर, स्वागताध्यक्ष राहुल जाधव, तसेच संस्थेचे सभासद, विश्वस्त, देणगीदार, हितचिंतक, पत्रकार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर विविध संस्कृतीक कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यामध्ये प्रथमतः दीपनृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर कोळीगीत, शेतकरीनृत्य, बालगीत, तबलावादन, माय मराठी असेबहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मोहिते यांनी केले.







