खेड लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांची दिवाळी वृद्धांच्या सहवासात

 

खेड(प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील जामगे, येथील वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सहवासात दिवाळी साजरी केली. धनत्रयोदशीच्या दिवशी बुधवारी पदाधिकाऱ्यांनी सर्व वृद्धांना फराळाचे वाटप केले.

वृद्धांच्या समवेत फटाके फोडून त्यांचा आनंद द्विगुणित केला. कुटुंबांपासून दूर असूनही लायन्स
क्लबमुळे स्वत:च्या घरी दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळाल्याच्या भावना वृद्धांनी व्यक्त केल्या

याप्रसंगी लायन्सच्या कोकण विभागाचे प्रथम प्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले, लायन्स क्लबचे अद्यक्ष सुरेश चिकणे, सचिव संतोष शिवदे माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष विनोद मोरे, सदस्य किशोर कोलगे डॉ. ज्ञानेश्वर मरकड, गौतम जैन विवेक कदम, स्टार क्लबच्या विनय चिखले आदी उपस्थित होते.