खेड दापोली मधील चिरे खाण कामगारांची नोंदच नाही

 

खेड (प्रतिनिधी) खेड दापोली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिरेखान व्यवसायिक यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे मात्र चिरे खाणीवर कामगार काम करणारे असलेले कामगार हे कुठून आलेत कुठून घेऊन मालक आलेत यांची शासनाच्या दरबारी कोणतीच नोंद नसल्याची बाब पुढे आली आहे

काम करणाऱ्या लोकांना मराठी नाही हिंदी भाषा बोलता येत हे कामगार बांगलादेशी तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील नाखरे कालकोंडवाडी या ठिकाणी अवैधरित्या असलेले १३ बंगलादेशी घुसखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तेव्हापासून नागरिक सावध झाले आहेत अशा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चिरे खाणीवर कामगार आले असल्याने त्यांची पोलिस ठाण्यामध्ये नोंद करणे गरजेचे असताना यांची कोणतीच नोंद नसल्याचे समजते

 

सध्या खारीपट्टा विभागामध्ये भर पावसाळ्यापासून विनापरवाना वाळूचोरटी उत्खनन सुरू असून काही ठिकाणी पर राज्यातील कामगार वाळू उत्खनन करण्यासाठी काम करीत आहे अनेक ठिकाणी ते फिरताना दिसत असताना ग्रामस्थांच्या मनामध्ये वेगवेगळे शंका निर्माण होत असते सध्या खेड खाडी पट्ट्या तील खेड बहीरवली मार्गावर चोरटी वाळू मोठ्या प्रमाणात डंपरच्या सहाय्याने सुरू आहे तसेच चिरेही वाहतूक होत आहे मात्र यांच्याकडे कोणतीच वाहतुकीची पास किंवा रॉयल्टी नसल्याचे बोलले जात आहे मात्र प्रशासन या बाबीकडे कोणतेच लक्ष देत नसल्याची बाब देखील पुढे आली आहे