सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा वाहक गाड्या वर्दळीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दुर्गंधीचा त्रास

 

सावंतवाडी: प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेच्या कचरा वाहक गाड्या नगरपरिषद कार्यालय समोरील रस्त्यावरच पार्किंग करण्यात येत असल्याने दुर्गंधीचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. सायंकाळच्या सत्रात या कचरा वाहतुकीच्या गाड्या बस स्टॉप नजीकच पार्किंग करण्यात येतात. त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी सदर गाड्या अन्यत्र ठिकाणी पार्किंग करण्याचे निर्देश चालकांना द्यावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा वाहक गाड्या एसटी बस थांब्यानजीक पार्क करण्यात येतात. त्यामुळे सायंकाळच्या सत्रात मोती तलावावर फेरफटका मारणाऱ्या वृद्ध तसेच शाळकळी मुले व महिलांना दुर्गंधीचा त्रास होतो. सदर कचरा वाहक गाड्या अन्यत्र पार्किंग कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.