खेड-भरणे मार्गावर कारसह तीन दुचाकी बेवारस स्थितीत

 खेड(प्रतिनिधी) खेड-भरणे मार्गावर एका हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यालगत एका कारसह ३ दुचाकी बेवारस स्थितीत उभ्या आहेत. ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एरव्ही कोणत्याही मार्गावर अनेक दिवसांपासून उभी असलेली बेवारस वाहनांचा शोध घेण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या पोलीस यंत्रणेला या मार्गावर.उभी असलेली वाहने निदशर्नास येत नाही. का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बेवारस स्थितीतील वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढाकार का घेत नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या मार्गावर उभ्या असलेल्या बेवारस स्थितीतील वाहनांमुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी करण्यात आली असली तरी पोलीस यंत्रणा वाहने ताब्यात का घेत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. खेड-भरणे मार्गावर रस्त्यालगत वाहने दुरुस्तींची दुकाने आहेत. या दुकानात दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यालगत वर्षानुवर्षे उभी केली जात असल्याचे समोर आले आहे.