माजगांव मेटवाडा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाचे आयोजन
बेळगावातून उपस्थित असलेल्या दोन संघाना विशेष पारितोषिक
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव- मेटवाडा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “दिपावली शो टाईमच्या” रेकॉर्ड डान्स स्पर्धेत वैष्णवी बोडके लहान गटातून तर विजय आलासे हा मोठ्या गटातून मानकरी ठरले आहेत.
तसेच लहान गटातून व्दितीय क्रमांक निधी खडपकर, तृतीय क्रमांक शोर्या सोनसुरकर तर उत्तेजनार्थ दिशम परब यांना तर मोठ्या गटातून व्दितीय क्रमांक घनशाळ सोनळे, तृतीय क्रमांक पुर्वी मेस्त्री आणि उत्तेजनार्थ म्हणून जयेश वेंगुर्लेकर यांना गौरविण्यात आले.
मंडळाच्या माध्यमामून नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेनिमित्त खास बेळगाव येथून आलेल्या चेतन कलामंच आणि अबिंका ग्रुप यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात आले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.












