सहकाराच्या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक प्रगती उंचावेल : विवेकानंद वाघ

साळशी येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

शिरगाव (प्रतिनिधी) शेतकरी आणि सैनिक हे देशाचे आधारस्तंभ आहेत.
सहकाराचे क्षेत्र मोठे आहे. भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा अंगीकृत करून शेतक-यांच्या हितासाठी हि संस्था स्थापन झाली आहे. शेतक-यांची होणारी पिळवणूक व त्यांच्या न्यायासाठी हि संस्था गेली ५ वर्षे कार्यरत आहे.शेतकरी संघटीत झाला तर त्याची ताकद मोठी आहे.त्यातूनच क्रांती घडून शेतक-यांची आर्थिक प्रगती उचावेल असे प्रतिपादन मे.वेंकटेश्वरा को. ऑप.पाॅवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.चे व्हा.चेअरमन विवेकानंद वाघ यांनी साळशी येथे केले.

 

 

देवगड तालुक्यातील आकांक्षा कॅश्यु अँग्रो प्रा.लि.यांच्या समन्वयाने वेंकटेश्वरा को.ऑप.पाॅवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.नाशीक यांच्या सहकार्याने साळशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. शेतक-यांच्या कच्चा मालाला भाव मिळत नाही मात्र त्यावर प्रोसेसिंग ( प्रक्रीया)केली तर त्यास चांगली किंमत मिळते.यासाठी या संस्थेचे सभासद व्हा. तालुक्यात कृषी सेवा केंद्र सुरु करुन याच्या माध्यमातून शेतक-यांना खते, औषधे,बियाणे रास्त भावाने देण्यात येतील.माती व पाण्याचे परिक्षण करण्यात येईल. शेतक-यांचा माल बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केला जाईल. झाडाच्या संगोपनासाठी तज्ञाचे मार्गदर्शन करण्यात येईल. असे मिळणारे फायदेही सांगितले.
यावैळी यासंस्थेचे कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर यांनीही या संस्थेची वाटचाल व विविध उपक्रमा विषयी माहिती दिली.यावेळी साळशी सरपंच वैशाली सुतार,कुवळे सरपंच सुभाष कदम, माजी प.स.सदस्य सुनील गावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
आकांक्षा कॅश्यु अँग्रो प्रा.लि.चे अध्यक्ष राजेंद्र नाईक यांनी,या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांसाठी सुवर्ण संधी असून त्याचा फायदा घ्या.तसेच या संस्थेचे सभासद होण्यासाठी शेतक-यांची सभासद वर्गणीमध्ये ५० टक्के रक्कम आकांक्षा कॅश्यु प्रा.ली.उचलेल.
असे सांगीतले.

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन नाईक यांनी केले. आकांक्षा कँश्यु प्रा.ली.चे संचालक संजय कदम यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी स्लाईड शो द्वारे संस्थेच्या विविध उपक्रमाची माहीती दाखविण्यात आली.यावेळी शेतक-यांनी शेती विषयक विचारलेल्या प्रश्नाना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर साळशीचे सरपंच वैशाली सुतार,उपसरपंच कैलास गावकर, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री,कुवळेचे सरपंच सुभाष कदम, माजी जि.प.सदस्य सुनिल गावकर, साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत, वेकटेश्वरा को.ऑप . पाॅवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.चे उपाध्यक्ष विवेकानंद वाघ,मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर,कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम,पुणे विभागाचे समन्वयक संजय आंब्रे,संचालक संतोष ढोले,आकांक्षा कॅश्यु कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, संचालक संजय कदम, चंद्रकांत जांभळे,जयवंत सावंत, संजय कदम,डाॅ.प्रभाकर शेळके, तसेच साळशी,चाफेड व कुवळे गावातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

चौकट :
वेंकटेश्वरा को.ऑप. पाॅवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ मन का बात’ या कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे.