रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना 1 मार्च 2026 रोजी पहाटे 4 ते 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वा.सुमारास घडली आहे.
याबाबत अमरदीप पसिंग सतनाम सोखी (33,सध्या रा.भोके,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,1 मार्च रोजी त्यांनी आपल्या मालकीची ॲक्सेस दुचाकी (एमएच-08-बीलएल-2507) ही रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये पार्क करुन ठेवली होती. दुचाकी पार्क करुने रेल्वेने बाहेरगावी गेले होते. 4 एप्रिल रोजी ते रत्नागिरीत परतले असता त्यांना पार्किंगमधील आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांची आजुबाजुला तसेच शहरातील इतर ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











