ह. भ. प. शरददादा बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त माहेर संस्थेस विविध वस्तूंची भेट

 

ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने मदत

खंडाळा : संत तुकाराम गाथेचे अभ्यासक, आयुर्वेदाचाचे जाणकार आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती ह. भ. प. शरददादा बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील माहेर संस्थेस विविध भौतिक सुविधा देणाऱ्या वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू आणि सर्व विद्यार्थी, महिला व पुरुष यांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे

 

 

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती शरद दादा बोरकर यांनी आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक सेवा करताना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, साहित्यिक आणि आयुर्वेद या विषयात मोठ्या प्रमाणात कार्य केले होते. त्यांच्या कार्याची आठवण आजही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वचजण काढतात असतात. त्यांचे राजकीय क्षेत्रातील योगदान सर्वच राजकीय पक्षासाठी आदर्शवत होते. त्यामुळे त्यांच्या याच कार्याची जाणीव ठेवत ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील माहेर संस्थेत जाऊन त्यांच्या मागणीनुसार विविध भौतिक वस्तू, जीवनावश्यक वस्तू आणि खाऊंचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे समीर बोरकर, माजी सरपंच निखिल बोरकर, संतोष बोरकर, संदेश महाकाळ, माहेर संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.