रत्नागिरी:
भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत विनायक घनवटकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य व शक्ति केंद्रप्रमुख राज देवरुखकर, बूथ प्रमुख सुयोग भिडे , युवा कार्यकर्ता , जिल्हा कार्यकरिणी सदस्य डॉ. चैतन्य वामन घनवटकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत सदस्य सौ मृणाल महेश घनवटकर, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश मोरेश्वर घनवटकर, महिला कार्यकर्ता रेखा दामोदर जोशी कोतवडा जिल्हा परिषद गट युवासेना प्रमुख अमित प्रभाकर घनवटकर, अमोल अनंत गुरव, यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सदर जल्लोष कार्यक्रमास उपस्थित होते
शपथविधी कार्यक्रम श्री सुयोग भिडे यांच्या निवासस्थानी ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आला. मोराया चौक येथे यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिठाई, आईसक्रीम, आणि अल्पोपहार याचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. सोबतच सर्वांनी जय श्रीराम म्हणत देशभक्तीपर घोषणा दिल्या.
उपस्थित भक्तगण पर्यटक आणि स्थानिकांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.









