अमली पदार्थ सोबत ठेवणाऱ्या रत्नागिरी शहरातील मच्छि मार्केटनजीक येथील तरुणावर गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील मच्छि मार्केटनजीक गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशिरपणे आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 3 हजार 400 रुपयांचा 136 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवार 24 एप्रिल रोजी करण्यात आली.
अदनान बशिर मस्तान (30,मुळ रा.मिरकरवाडा सध्या रा.किर्तीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार बाळू जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी संशयित हा मच्छि मार्केटजवळ असलेल्या केळीच्या वखारीजवळ 136 ग्रॅम गांजा विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एनडीपीएस ॲक्ट 1985 चे कलम 8(क),20(ब),2(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.