देवरुख येथे दोन वर्षांपूर्वीच्या आंबे चोरी वरून झालेल्या बाचाबाचीत प्रौढाला मारहाण

रत्नागिरी ः प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी आंबे चोरल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन प्रौढाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना देवरुख तालुक्यातील कोंडगाव सिमेचा पुल नेवरे वरचीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवार 23 एप्रिल रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली.
याप्रकरणी सुरेश देवजी गोरुले (रा.पूर्ये तर्फे देवळे खालचीवाडी,संगमेश्वर) याच्यावर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात राजेंद्र नारायण रामाणे (58,रा.तिवेरे तर्फे देवळे वरचीवाडी,संगमेश्वर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी ते कोंडगाव सिमेचा पुल येथून तिवरे वरचीवाडी जाणाऱ्या रस्त्याने चालत जात होते. त्यावेळी संशयित सुरेश गोरुले याने दोन वर्षांपूर्वी फिर्यादीच्या बागेतील कोणीतरी आंबे चोरले होते. त्यावरुन फिर्यादीशी झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन फिर्यादीच्या डोक्यात,पाठीमागे डाव्या बाजूस तसेच छातीवर डाव्या बाजूस लाकडी दांडक्याने मारहाण करत दुखापत केली.