रत्नागिरी : 6 डिसेंबर 2024 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व स्वयंसिध्दा गृप ऑफ सोशल वर्क कोकण यांच्या कडून जि. प. प्राथमिक शाळा पालवण नं. 1 येथे विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्वयंसिद्धा गृपच्या संस्थापिका सिद्धी चाळके मॅडम, अनिकेत जाधव सर व पुर्वा वाडकर तसेच शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री पाडवी सर, पाटील मॅडम व भुवड मॅडम ऊपस्थिस होत्या.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले, “ऊठा शिका आणि समृद्ध व्हा” या त्यांच्या विचारांच एक प्रतिक म्हणून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सिद्धी मॅडम यांनी सांगितले. हि संस्था कोकणाच्या विकासाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत. त्यांना शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा सर्वच घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.विद्यार्थी गटाला प्रोत्साहन देणे हे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर श्री पाडवी सर यांनी संस्था सदस्यांचे आभार मानले व शुभेच्छां दिल्या.











