पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शृंगारतळी | वार्ताहर
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापारीनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलया फाउंडेशन संस्थेचे विश्वस्त मा. चेतन गोडबोले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

यावेळी महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संक्षेपात परिचय करून देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. तसेच निलया फाउंडेशन संस्थेचे विश्वस्त मा. चेतन गोडबोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले भारतीय संविधानाचे महत्व सांगून त्यांच्या या महान कार्याला सलाम करून बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, डॉ. सुभाष खोत, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण व महावि‌द्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले