शृंगारतळी बाजारपेठ दरम्यानच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबत

Google search engine
Google search engine

Regarding undergrounding of power lines between Shringartali market

उप कार्यकारी अभियंता, महावितरण, गुहागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरचे निवेदन

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ दरम्यानच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात यासाठी उप कार्यकारी अभियंता, महावितरण, गुहागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठे मधील जानवळे फाटा ते मळण फाटा दरम्यान विद्युत वाहिन्या गेली कित्येक वर्षे न बदलल्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत. पाऊस, वारा – वादळ इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे या विदयुत वाहिन्या केव्हाही तुटून पडू शकतात, त्यामुळे जीवित हानी होऊ शकते.शृंगारतळी बाजारपेठ ही गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज हजारोच्या संख्येने तालुक्यातून जनसामान्याची ये जा या बाजारपेठेत होते. तसेच शेकडो वाहने दररोज या मार्गावरून प्रवास करत असतात.

बहुतेक विदयुत वाहिन्या या रस्त्यालगतच असून दुकान व इमारती यांच्या जवळून गेल्या आहेत. तर काही जमिनी पासून जवळच्या अंतरावर लोंबकळत आहेत तसेच काही विदयुत वाहिन्या दुकानाच्या छप्परा वस्न गेल्या आहेत, तर काही विद्युत खांब दुकाने व हॉटेल यांच्या मध्यभागीच असल्याचे आढळून येत आहे, त्या ठिकाणी ग्राहकांची ये-जा चालू असते. या खांबांना चुकून विद्युत प्रवाह सुरू असल्यास या विदयुत खांबांना ग्राहकांचा स्पर्श झाल्यास त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. जर विदयुत वाहिन्या भूमिगत केलात तर अशा प्रकारचे कोणतेही दुर्घटना होऊ शकणार नाही. या महत्वाच्या विषयावर आपण निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.तरी या निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे आक्रमक भूमिका धारण करेल तसेच पुढील होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा इशारा मनसे गुहागर अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे. निवेदन देताना शुंगारली उपतालुका प्रसाद कुष्टे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, शृंगारतली विभाग अध्यक्ष जितु साळवी, महाराष्ट्र सैनिक विवेक शिर्के, उपस्थित होते