रोटरी स्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न.

खेड
गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी पीएचसी फुरुस मार्फत रोटरी स्कूलमधील पालक व शिक्षकांसाठी एचपीव्ही लसीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी पीएचसी फुरुसचे वैद्यकीय अधिकारी श्री. पडवळ , पर्यवेक्षक श्री. जाडकर व श्री. कुणाल पाटील उपस्थित होते. त्यांचे स्वागत माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर यांच्या शुभहस्ते पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आले.

शासना मार्फत राबवण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरणचा मुख्य उद्देश एचपीव्ही लस ह्युमन पॅपिलोमाव्हायरस संसर्गापासून संरक्षण करणे ज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो ही लस शरीराला एचपीव्हीच्या विशिष्ट प्रकारांशी लढण्यासाठी तयार करते ज्यामुळे संक्रमण रोखले जाते. गर्भाशयाच्या कर्करोगाविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसाकरणाची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये अनेक पालकांच्या शंकांची निरासन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके आदि मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. विधी भोसले यांनी केले.