देवगड (प्रतिनिधी) श्री स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम ट्रस्ट पाटथर येथे शनिवार १४ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ५:३०वा काकड आरती,नामस्मरण,मंगल आरती.सकाळी ९ ते ९:३० पादुका अभिषेक गुरु सप्तशती पारायण. सकाळी १० ते दुपारी १२ दत्तगगनगिरी यज्ञ, दुपारी १२ ते १ महाआरती,दुपारी १ ते ३ महाप्रसाद दुपारी ३ ते ४ हरिपाठ , सायं ४ ते ६ कीर्तन बुवा योगिता पवार ओरोस वर्दे, सायंकाळी ६ ते ७ दत्तजन्म, सायंकाळी ७ ते ८ पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद. रात्री ८ पासून विविध भजने व ढोल वादन अधिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक ग्रामस्थ भक्त परिवार श्रमिक सेवा मंडळ श्री स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम पाटथर यांच्या वतीने करण्यात आले आहे.












