
लांजा (प्रतिनिधी) विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रथमच लांजा येथे आलेल्या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचे लांजा येथे जंगी स्वागत करण्यात आले .
लांजा शहरातील कोर्ले फाटा बसवेश्वर चौक येथे लांजा नगरपंचायत प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका सौ. दुर्वा प्रसाद भाईशेट्ये व पदाधिकारी प्रसाद भाईशेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किरण सामंत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी महिलांनी आमदार किरण सामंत यांचे आरती ओवाळून औक्षण केले.त्यानतर नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये व प्रसाद भाईशेट्ये व अन्य पदाधिकारी यांनी भला मोठा पुष्पहार घालून आमदार किरण सामंत यांचे स्वागत केले .
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप,
नगराध्यक्ष मनोहर बाईत, अन्य शिवसेना पदाधिकारी नगरसेवक आणि लांजा प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












