लांजा भटवाडी शाळा नंबर 3 चा विद्यार्थी स्वरूप संतोष कोत्रे याचे सुयश

 

लांजा (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या कन्या केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत लांजा भटवाडी शाळा नंबर 3 चा विद्यार्थी स्वरूप संतोष कोत्रे यांने घवघवीत यश संपादन केले आहे.
लांजा कन्या केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच लांजा शाळा नंबर 5 या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत लांजा भटवाडी शाळा नंबर 3 चा इयत्ता चौथीचा विद्यार्थी स्वरूप संतोष कोत्रे याने उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे 50 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच याच शाळेचा विद्यार्थी मंथन कोत्रे याने लांब उडीत द्वितीय क्रमांक मिळवला.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शांताराम लांबोरे आणि शिक्षक नरेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या यशाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचे पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.