माखजन हायस्कुल येथे १९ रोजी होणार जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा

 

पहिल्या फेरीत १७ मुलांची निवड

माखजन : वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे १९ डिसेंबर रोजी,कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षातर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत एकूण १७ स्पर्धक असणार आहेत
पहिली फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.यामध्ये लहान गटातून ८ तर मोठ्या गटातून ९ स्पर्धक निवडण्यात आले आहेत.

लहान गटात निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये अर्णव सरपोतदार,मुक्ता बापट,दिया परब, वेदीका गांधी,मुक्ता आंबेकर,इरा गोखले,आराध्य राजपूत,मीरा खेडेकर आदींचा समावेश आहे तर मोठ्या गटात श्रुष्टी तांबे,ऐश्वर्या सावंत,कैवल्य मुसळे,शारदा पटवर्धन,सई नर,अक्षया लवंडे,प्रियल ऐवळे,गिरीराज लिंगायत आदींचा समावेश आहे.
स्पर्धेच्या अधिक माहिती साठी संगीत शिक्षक विशारद गुरव (९४०५९५३४५२) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १९ रोजी सायंकाळी ६.३० वा संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार असून,रसिकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे.यास्तव संगीत प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी केले आहे.