रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड स्थित जेएसडब्ल्यू कंपनी शेजारील नंदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दुपारपासूनच मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या शाळेतील तब्बल 53 विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या श्वासोच्छवासाचा आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला.
या 53 पैकी 51 जणांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. या शाळे शेजारी जेएसडब्ल्यू कंपनीचा प्लांट आहे. येथूनच साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वायू गळती होऊन हवेमध्ये गॅस पसरला आणि त्याचाच नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला.
सुरुवातीला या त्रासाची तीव्रता कळली नाही, मात्र जसजसा वेळ गेला तसतसा विद्यार्थ्यांना मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर येथील विद्यार्थिनींना सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बाधित 53 विद्यार्थ्यांपैकी सदतीस विद्यार्थी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.
हे विद्यार्थी सध्या धोक्याबाहेर आहेत. त्यानं श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच पोटात दुखत होते. मात्र विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत , हे कशामुळे झाले याबत आम्हाला माहिती नाही परंतु वायू गळती मुळे त्रास होऊ शकतो असे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले











