ओटवणे (प्रतिनिधी ) बांदा येथे पार पडलेल्या प्रभाग स्तरीय शालेय बाल क्रिडा स्पर्धेत जि. प. पूर्ण प्राथ. शाळा विलवडे नं 1 ने आपला वरचष्मा दाखवला असून अनेक प्रकारात पदके मिळवत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मुलींच्या वैयक्तिक मोठ्या गटात कु. श्रावणी सावंत हिने 200 मी. धावणे व उंच उडीत द्वितीय क्रमांक पटकावला. सांघिक प्रकारात मोठ्या गटात मुली खोखो मध्ये विजेता तर रिले 100 मी उपविजेता. मोठा गट मुलगे मानस दळवी 200 मी धावणे प्रथम तसेच उंच उडी मध्ये द्वितीय. 100 मी धावणे आयुष सावंत द्वितीय. सांघिक गटात कबड्डी संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.रिले उपविजेता. लहान गट मुली रिले विजेता.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल विध्यर्थ्यांचे,शाळेचे मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे गावचे सरपंच श्री प्रकाश दळवी, शाळा व्यवस्थापन समिती समिती, मुख्याध्यापक मनोहर गवस, पदवीधर शिक्षक श्री प, जेष्ठ शिक्षिका श्रीमती सुष्मिता मांगले , यांनी अभिनंदन केले व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











