ना. एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पाळला
दापोली l प्रतिनिधी: बरेच दिवस रखडलेला मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर अधिवेशाच्या तोंडावर मुहूर्त मिळाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. आजच संध्याकाळ पर्यत महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे.
शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे कोकणातील सगळ्यात युवा आमदार म्हणून ओळखले जातात. विधानसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे दापोली येथील आयोजित जाहीर सभेत ‘तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो’ असा शब्द जाहीर सभेत दिला होता. आता या शब्दाची वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करताना दिसत आहेत. शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये यासाठी मोठे उत्साह च वातावरण आहे. दापोली-खेड-मंडणगड मतदार संघातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूर येथे पोहोचले आहेत. शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. त्याचा उपयोग कोकणासाठी व महाराष्ट्रासाठी विकासासाठी माझ्या मतदारसंघासाठी होईल. माझ्यासाठी हा सगळ्यात आयुष्यातला मोठा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे युवानेते आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
49 वर्षांनी दापोलीला मिळणार मंत्रिपद मिळणार आहे. 1975 तत्कालीन काँग्रेसचे कोकणातील नेते रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे आमदार असताना त्यांच्यावर काँग्रेस कडून राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता दापोली मतदारसंघाचे मंत्री होणारे योगेश कदम हे दुसरे आमदार ठरले आहेत.











