दोडामार्ग:सुहास देसाई :महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच राजभवन येथे संपन्न झाला यामध्ये भाजपाचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये मंञी पदाची शपथ घेतल्यानंतर दोडामार्ग शिवाजी चौकात दोडामार्ग तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मोठया संख्येने युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा जिल्हा पदाधिकारी
राजेंद्र म्हापसेकर, चंद्रकांत मळीक, सुधीर दळवी, पांडुरंग बोर्डेकर, प्रकाश गवस, नितीन मणेरीकर, देवीदास गवस, समीर रेडकर, सुनिल गवस, रामचंद्र मणेरीकर, शामसुंदर चांदेलकर, राजेश फुलारी, संध्या प्रसादी, रामचंद्र ठाकूर, संतोष नानचे, प्रविण आरोदेंकर, आनंद तळणकर, वैभव सुतार, संतोष नाईक इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












