केर – भेकुर्ली ग्रुप ग्रामपंचायतचा उपक्रम
दोडामार्ग l सुहास देसाई :कोकणात विशेष करुन डोगर दर्या तून वाहणाऱ्या नदी या खळाळणाऱ्या असतात त्यामुळे जंगलातील पालापाचोळा,दगड, माती आदींनी(पाण्याची खोल भाग)’कोंडी’ बुजल्या गेल्या आहे यामुळें पाणी साठा एकत्र थांबत नाही. पूर्ण नदी गाळ काढण्याएवढा निधी सर्वच ग्रामपंचायतकडे मिळणे अशक्य असते मात्र गावातील पाळीव प्राणी व जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतने आपणास शक्य आहे एवढे पाऊल उचलले आहे याचाच भाग म्हणून बांधावरची नदी येथे मातीनाला बांध केर येथे घालण्यात आला आणि पाणी साठवण करण्यात आली.
या कामी युवक ओमकार देसाई यांनी स्वयंस्फूर्तीने काम केले याकामी ग्रामसेवक संदीप पाटील, सरपंच- रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच – तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य – मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी यांसह ग्रामस्थ, युवक यांचे चांगले सहकार्य मिळाले. असल्याचं केर गावचे उपसरपंच तेजस देसाई यांनी सांगितले








