मिरकरवाडा येथील घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी ;शहरातील मिरकरवाडा येथील बोट बांधायच्या लोखंडी पाईपला अडखळून पडलेल्या अज्ञात तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वा.सुमारास घडली.
हा अज्ञात तरुण मिरकरवाडा येथील समीना जेट्टी नविण मच्छिमार्केटच्या मागे दारु प्राशन केलेल्या स्थितीत होता. तो तेटीवरील बोट बांधायच्या लोखंडी पाईपला अडखळून पडल्याने त्याच्या डोक्याला समोरुन नाकाला, गालाला गंभिर दुखापती झाल्याने तो बेशूध्द पडला. त्याला तेथील काही नागरिकांनी उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.









