येत्या ३ तासातील पावसाचा इशारा रत्नागिरी आणि कोल्हापूरसाठी

मुंबई : भारतीय वेधशाळेकडून संध्याकाळी ७.१५ वाजता प्रसिद्ध केलेल्या इशाऱ्यानुसार येत्या ३ तासांमध्ये रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह गडगडाटी पाऊस तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.