खेड(प्रतिनिधी) थकीत नळ पाणी पट्टीचे पैसे मागण्या साठी गेलेल्या महिलेला तिघांनी बेदम मारहाण करून घराची नासधूस केल्या प्रकरणी तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना २२ रोजी सकाळी ११ वाजता एम आय बी स्कुल नजीक घडली
तन्मय सुदेश खेडेकर ६१, सार्थक सुदेश खेडेकर व अन्य एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत
यातील फिर्यादी महिला यांचे भाडेकरु जन्नत पेडेकर यांचेकडे थकित नळपट्टीचे पैसे मागण्याकरिता गेली असता लफिर्यादी यांना कोणाची नळपट्टी मागायला आलीस नळ तोडतेस का असे बोलुन शिवीगाळी करु लागला व तु ईथे आलीस तर तुला ठार मारुन टाकिन अशी धमकि दिली. त्या नंतर लाकडी दांडक्याने उजव्या हाताच्या मनगटावर फटका मारला त्यानंतर फिर्यादी च्या घरात शिरून तिला तुमचा आज निकाल लावतो. अशी जिवे मारण्याची धमकि देत .टी.व्ही फोडुन घराची नासधूस करुन १५ हजार रुपयेचे नुकसान केले. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे











