राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची प्रकाश केळुसकर प्रथम

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या कालावधीत ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद जि . बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती. सदर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रकाश शंभा केळुसकर ( गुरुजी ) रा . आंबेगाव ता .सावंतवाडी , जि .सिंधुदुर्ग यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्त त्यांना प्रशस्तीपत्र ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि रोख रक्कम रुपये ५००० देऊन सत्कार करण्यात आला . सदर स्पर्धेमध्ये एकूण ६७ जणांनी सहभाग घेतला होता . त्याप्रसंगी सत्कार करताना ह.भ.प. गुरुवर्य श्री सुदर्शन महाराज सांगवीकर आणि डावीकडून बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड आर .डी .येवले , प्रा. हरिश्चंद्र बोडखे आणि उजवीकडून आयोजक श्री पांडुरंग गर्जे, अँड. बाळासाहेब बोडखे , खिळदचे सरपंच डॉ. श्रीराम गर्जे आणि महंत श्री काशिनाथ महाराज शास्त्री आणि मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत लोखंडे गुरुजी. आदी मान्यवर उपस्थित होते . त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .