नागपूर विधानभवनातून
संतोष वायंगणकर
नागपूरला फारच थंडी आहे. अशी चर्चा महाराष्ट्रभर होत असते. कोकणातील थंडी अनुभवणार्याना नागपूरची बोचरी, गुलाबी थंडी अनुभवताना त्याला फारस काही वाटत नाही. ना. नितेश राणे मंत्री झाल्याने सहाजिकच कोकणातील असंख्य लोक नागपूरला आलेत. त्यांच्या मध्ये सहज चर्चा नागपूरच्या थंडीची होताना दिसत होती. कोकणात यापेक्षा अधिक थंडी कशी आहे. याच्या गजाली नागपूरच्या विधानभवनाच्या परिसरात होताना दिसत होती. विधीमंडळ अधिवेशनाचा मंगळावारचा दुसरा दिवस विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यावर मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी औचित्याच्या मुद्दयान्वये विधानसभेत कोकणातील मच्छिमारांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या मलपी बोटीचे होणारे आक्रमण कोकणातील मच्छीमारांवर अन्याय करणारी व मच्छिमारांना उध्वस्त करणारी आहे. कोकणातील समुद्रातून होणारी लूट रोखण्यासाठी गस्ती नौकांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी आ. निलेश राणे यांनी करुन कोकणातील मच्छिमाराना आणि मच्छ व्यवसायाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आ. निलेश राणे यांनी केली. आ. निलेश राणे यांनी विधानसभेत पहिल्याच अधिवेशनात कोकणातील मच्छिमारांच्या प्रश्नाची चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे. उचित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. मंगळवारच्या विधीमंडळातील कामकाजात सुरुवातीला काँग्रेसच्या आमदारांनी थोडावेळ सहभागी होऊन दिवसभराच्या कामकाजासाठी न थांबता काॅग्रेसी सदस्यांनी काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चैनीताल हे नागपूरला आले असल्याने काॅग्रेसचे आमदार काॅग्रेसच्या बैठकीला निघून गेले. यामुळे सभागृहात मोजकेच सदस्य उपस्थित होते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना आ. निलेश राणे यांनी कोकणातील अनेक प्रश्नांची मांडणी करताना त्यावरची उपाययोजना काय करणे आवश्यक आहे. यासंबंधी ची आ. निलेश राणे यांनी अतिशय प्रभावीपणे मांडणी केली. आज पत्रकार कक्षातही आ. निलेश राणे यांच्या सभागृहातील भाषणाचीच चर्चा होती. आ. निलेश राणे यांनी कोकणातील आरोग्यसेवाचा प्रश्न किती गंभीर होत आहे. याची मांडणी केली. अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना आ. निलेश राणे म्हणाले राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना केवळ वरवरची चर्चा करुन चालणार नाही. तर त्यासाठी खोलवर त्यावर चर्चा झाली पाहिजे. प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे. त्यातून अपेक्षित असणारे आपणाला उद्यीष्ट साध्य करता येईल. कोकणातील शेतकरी रानटी जनावरे, माकड यामुळे कसे हैराण आहेत ते सांगताना बांबू लागवडीवर होणारा परिणाम कसा होत आहे. तेच सांगितले. आ. निलेश राणे यांनी सीआरझेडमुळे पर्यटनावर होणारा परिणाम यामुळे सीआरझेड बाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.गो हत्येचा मुद्दा मांडत आ. निलेश राणे यांनी गो हत्या होवू नये म्हणून सरकारने गांभीर्याने घ्यावे बंदी आणण्याची मागणी करण्यात आली.अनेक विधेयक मांडून ती सभागृहात सहमत झाली. मंगळवारच्या कामकाजात अनेक विषयांवर चर्चा झाली. आ. शेखर निकम यांनीही चर्चेत सहभाग घेतला. १०१ अंतर्गत बुधवारी सभागृहात बीड, परभणीतील घटनांवरील चर्चा होइल असे विधानसभा अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. दिवसभर सभागृहाचे कामकाज चालले.









