‘सलंग’ एकांकिकेने पटकावला शामराव करंडक

 

 

रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवांतर्गत गेली ३२ वर्षे अविरत चालू असलेल्या शामराव करंडक एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर ‘सलंग’ या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी खातू नाट्य मंदिरच्या भव्य रंगमंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अँड.विजय साखळकर,सचिव सतीशजी शेवडे , सहकार्यवाह श्री.श्रीकांत दुदगीकर, शामराव करंडक एकांकिका स्पर्धेचे मुख्य प्रायोजक राजनजी मलुष्टे , आजीव सभासद मंडळ सचिव प्रा . महेश नाईक , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.सुनील गोसावी , पर्यवेक्षक श्री विद्याधर केळकर, विज्ञान शाखा प्रमुख श्री दिलीपकुमार शिंगाडे , वाणिज्य विभाग प्रमुख सौ.शिल्पा तारगावकर,छंदोत्सव प्रमुख आणि कला शाखा प्रमुख श्री वैभव कानिटकर उपस्थित होते.

शब्द एक अविष्कार अनेक या स्पर्धेच्या संकल्पनेतंर्गत यावर्षी ‘अस्तित्व’ हा शब्द देण्यात आला होता. या शब्दाचे अनेक कंगोरे उलगडणार्‍या एकांकिका या स्पर्धेतंर्गत सादर झाल्या. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य ,प्रकाश योजना, ध्वनी या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थी स्वतः पार पाडतात. यातून रंगभूमीवरील भावी कलाकार घडतात. अशा या प्रतिष्ठित असणाऱ्या एकांकिका स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:- उत्कृष्ट एकांकिका – प्रथम – सलंग

द्वितीय – गडप

तृतीय -डेअर

उत्कृष्ट तांत्रिक अंग – प्रथम – सलंग

उत्कृष्ट प्रकाशयोजना – प्रथम – तनिष सनगरे(सलंग)

द्वितीय – संस्कार दत्ताराम पांचाळ (गडप)

तृतीय – निशिता मनोज पवार (गायब)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रथम – गौरव गिरीश कुलापकर(सलंग)

द्वितीय – सई संदीप थोरात (गडप)

तृतीय -हर्ष महेश बोंडाळे (आणि तोच हा)

पुरुष व्यक्तिरेखा – प्रथम -ह्रषिकेश शशिकांत कोतवडेकर (गडप)

द्वितीय – आर्यन विजय निकम (सलंग)

तृतीय – वेदांत प्रसाद चव्हाण (डेअर)

स्री व्यक्तिरेखा – प्रथम – शर्वरी किरण आडीवरेकर (सलंग)

द्वितीय – आभा मंगेश साखळकर (सलंग)

तृतीय – सिद्धी सुनील बंडबे(डेअर)

विनोदी व्यक्तिरेखा – मंथन पांडुरंग शिवलकर (गडप)

दिग्दर्शन – प्रथम – वरद उदय आरेकर (गडप)

द्वितीय – आर्या संजय भोळे (सलंग)

तृतीय -हर्ष अविनाश भाटकर (गायब)

सर्वोत्कृष्ट लेखन – प्रथम- आर्या संजय भोळे (सलंग)

द्वितीय – मिहिर प्रसाद पंगेरकर(गडप)

तृतीय – अदिती अशोक चव्हाण (डेअर)

नेपथ्य – प्रथम -आर्यन विजय निकम (सलंग)

द्वितीय – विघ्नेश सुजित जोशी (गडप)

तृतीय – मुस्कान मुबीन वाडकर (डेअर)

सर्वोत्कृष्ट खलनायक- वरद उदय आरेकर (गडप)

या स्पर्धेचे परीक्षण श्री गणेश गुळवणी आणि श्री शशिकांत महाजन यांनी केले. या एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी राजनजी मलुष्टे ,महाविद्यालयाचे आजी-माजी शिक्षक, रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि माजी विद्यार्थी यांनी विविध व्यक्तींच्या स्मरणार्थ बक्षीसे प्रायोजित केलेली असतात. विजेत्या संघाला फिरता चषक दिला जातो.

या एकांकिका स्पर्धेचे माननीय प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले.