गोमंतकीय कलाकारांची शिर्डीत साईचरणी सोमवार २३ रोजी भजनसेवा

 

 

बांदा : प्रवीण परब :  मोपा गावठणवाडा येथील श्री माउली एकता कला क्रीडा संस्था व अखिल गोमंतक साई सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ७.३० वाजता खास भजनाचा कार्यक्रम श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील श्री सदगुरू साईबाबा समाधी मंदिरात आयोजित केला आहे.

 

या कार्यक्रमात नितेश सावंत, विघ्नेश कांदोळकर, राजेश रेडकर, गुरूदास गांवकर, फिलू गांवकर, आत्माराम रेडकर, नागेश फडते, सुदन फडते, प्रविण कलमेकर, सुधाकर डिचोलकर, शिवदत्त डिचोलकर, भाग्येश रेडकर व सत्यवान नाईक गावकर आदी कलाकार सहभागी होतील.

 

गोमंतकीय कलाकारांना श्री साईबाबा संस्थान शिर्डीने आपली कला सादर करण्याच्या अनेक संधी आजवर दिल्या आहेत. गोमंतकीय कलाकार आपली कला साईबाबा समोर सादर करुन देशभरातील साईबाबा भक्तानी भक्तीरसाने गोमंतकाची शान वाढवत आहेत. गोमंतकीय संगीत ऐकण्यासाठी अनेक संगीत रसिक या सभाग्रहात मोठी गर्दी करतात व कलाकारांना चांगली दाद देतात, अशी माहीती श्री माऊली एकता कला क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यानी दिली.