सामाजिक बांधिलकी संघटनेची मदत
सावंतवाडी । प्रतिनिधी : कुडाळ येथील रहिवासी रामदास भगवान राणे ( वय ४२ रा. गणेश नगर ) या युवकाला अचानक रस्त्यावर पडला. ही घटना मोती तलावाच्या बाजूला संध्याकाळी सहा वाजता घडली. सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे, रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर यांनी रस्त्यावरून उचलून त्याला रुग्णालयात दाखल केले. सदर युवकाला फिट येऊन पडला असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, सदर युवकाला काही आठवत नाही असे त्याने सांगितले.










