UPDATE : परटवणे येथे मटण शॉपमध्ये कामाला निघालेला तरुण तिथे पोहोचलाच नाही…

 

 

अल्ट्राटेक कंपनी समोर दुचाकीला भरधाव डंपरची समोरून बसली धडक
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी। प्रतिनिधी : 
मिर्‍या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अल्ट्राटेक कंपनीसमोरील रस्त्यावर भरधाव डंपरची समोरून येणार्‍या दुचाकीला धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 6.45 वा.सुमारास घडली.

जाकिर मलंग रिफाई (22, रा.क्रांतिनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या मेव्हण्याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, जाकिर हा परटवणे येथील मटण शॉपमध्ये कामाला होता. बुधवारी सकाळी 6.45 वा. सुमारास तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एव्ही-5673) घेउन क्रांतीनगर ते परटवणे असा जात होता. त्याच सुमारास अज्ञात डंपर चालक आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-08-एपी-3070) घेउन परटवणे ते चर्मालय असा येत होता. ही दोन्ही वाहने अल्ट्राटेक कंपनीच्या समोर आली असता भरधाव डंपरची जाकिरच्या दुचाकीला समोरुन धडक बसली. त्यामुळे जाकिर डंपरच्य मागील चाकाखाली फेकला गेल्याने त्याचा जागिच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने अपघाताची खबर न देताच घटनास्थळावरुन पळ काढला आहे. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. या अपघातप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.