लोटेतील उद्योग वसाहतीची सुरक्षा ‘राम भरोसे’

खेड(प्रतिनिधी) रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील सातत्याने होणाऱ्या अपघातांकडे बहुतेक सर्वच संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करताहेत की काय? असा प्रश्न परिसरात जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. सातत्याने वायुगळतीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांच्या उरात आता धडकी भरली आहे.
साधारणपणे मागील वीस दिवसांचा विचार करता, आधी पुष्कर केमिकल अँड फर्टिलायजर्स या कंपनीत १८ जुलैला स्फोट होऊन तीन कामगार जखमी झाले. त्यांच्या जखमा भरण्यापूर्वीच नामांकित गणल्या जाणाऱ्या एक्सल इंडस्ट्रिज लि. कारखान्यात  २४ जुलै रोजी वायुगळती झाली. यात चाळकेवाडी, तलारीवाडीतील सात ग्रामस्थांना बाधा झाली. पुन्हा अशी चूक होऊ नये, म्हणून या ग्रामस्थांनीच स्थलांतरची मागणी केली.
मात्र, अशा घटना सातत्याने होऊ नयेत, यासाठी रासायनिक कारखान्याशी संबंधित असणाऱ्या यंत्रणा यातून काहीच बोध घेत नसल्याने, येथीलच योजना केमिकल कंपनीत पुन्हा वायुगळती झाली. त्यामुळे इथली सुरक्षा नक्कीच राम’भरोसे’ आहे का? असा प्रश्न उपस्थित केलाच, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी तसेच कारखान्यांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यामुळे येथील उद्योजक निश्चिंत झाले आहेत. कंपन्यांच्याविरोधात जर का काही स्थानिकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न
होतात. मात्र, इथले जीवनमान सध्या धोक्यात आले असून, याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. परिणामी, आम्ही फक्त रडत बसायचे आणि यंत्रणेने मात्र रोज मरे त्याला कोण रडे’ याप्रमाणे आमच्याकडे दुर्लक्ष करायचे का, अशी विचारणा केली जात आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट’च्या घोषणेचे काय?
दोन वर्षांपूर्वी इथे असेच अपघात घडत असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्वच कंपन्यांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा हवेत विरली असून, नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपन्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले असल्यास ते जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. मात्र, असे काहीच न होता सारेच आलबेल असल्याची चर्चा रंगू लागली आहे.