लांजा तालुका उर्दू संघटनेचे अध्यक्ष मुस्तकीन पटेल यांचा शिक्षक संघात जाहीर प्रवेश

 

 

लांजा (प्रतिनिधी ) प्राथमिक शिक्षक संघाच्या ध्येय धोरणांनी प्रेरित होऊन लांजा तालुका उर्दू प्राथमिक शिक्षक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मुस्तकीन पटेल यांनी नुकताच प्राथमिक शिक्षक संघामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मंगेश मोरे व तालुका नेते नंदकुमार पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील सर्वात मोठी संघटना असून अनेक शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे विषय शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे.त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुकास्तरावरील अनेक महत्त्वाचे प्रश्न प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोडवण्यात आलेले आहेत. संघटनेच्या वाढत्या विश्वासार्हतामुळे व संघटनेच्या ध्येय धोरणांना प्रेरित होऊन लांजा उर्दू संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री पटेल यांनी प्राथमिक शिक्षक संघामध्ये प्रवेश केला आहे.

मुस्तकिन पटेल यांनी आजपर्यंत अनेक शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मोलाची मदत केली आहे. तालुकास्तरावरील किंवा जिल्हास्तरावरील अनेक महत्त्वाची कामे पार पाडली आहेत. अनेक शिक्षकांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रकर्षाने वाचा फोडली आहे.

दरम्यान, मुस्तकीन पटेल यांच्या जाहीर प्रवेश कार्यक्रम प्रसंगी एप्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मंगेश मोरे, तालुका नेते नंदकुमार पाटोळे , कार्याध्यक्ष नानासाहेब गोरड , सचिव बळीराम सोळंके, संजय पवार , श्री राठोड आदी लांजा तालुका प्राथमिक शिक्षक संघ शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री मुस्तकीन पटेल यांचा तालुका शाखेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला