
श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी रिंगणे, मुंबई या मंडळाचे सहकार्य
संतोष कोत्रे l लांजा-: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी रिंगणे, मुंबई या मंडळाच्या वतीने सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळा,महाविद्यालये या ठीकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याचा व ३० सप्टेंबर पर्यंत न बसविल्यास सदर शाळा, महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येईल असा अध्यादेश जारी केला. याची अंमलबजावणी करण्यासाठी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रिंगणे येथे श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी रिंगणे, मुंबई या मंडळाच्या वतीने सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
याकरीता मंडळाच्या मुंबई व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भरघोस निधी उभा केला व सदर काम पुर्ण केले.त्यामध्ये श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी मुंबई चे अध्यक्ष सुभाष हांदे , सरचिटणीस सुरेश हांदे, सल्लागार रविंद्र हांदे, कार्यकर्ते उदय हांदे, प्रशांत हांदे, स्वप्नील हांदे, राजेश हांदे, प्रविण हांदे, राजेंद्र हांदे व इतर सर्व मुंबई मंडळाचे कार्यकर्ते तसेच श्री दत्त प्रासादिक हांदे आणि मंडळी रिंगणे या स्थानिक शाखेचे अध्यक्ष युवराज हांदे, सरचिटणीस विनोद हांदे, प्रकाश हांदे, नामदेव चंदुरकर, संतोष चंदुरकर, सुरेश हांदे, रघुनाथ हांदे, विजय हांदे आणि सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. तसेच हे कॅमेरे बसविण्याचे काम सुनील शेट्ये यांच्या मिसा ट्रुकॅचर सर्व्हिसेस डोंबिवली , मुंबई यांनी केले.











