डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा व डेज उत्साहात संपन्न

 

मंडणगड/ प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दिनांक ९ ते १९ डिसेंबर २०२४ या दरम्यान वार्षिक क्रीडा स्पर्धा व डेज उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे दिनांक ९ ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये विविध प्रकारचे डेज सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साडी डे, टाय डे, मिस मॅच डे, चॉकलेट डे, पारंपारिक डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, कॅप डे, ट्विन्स डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

तसेच १७ डिसेंबर २०२४ ते १९ डिसेंबर २०२४ यादरम्यान क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खो-खो, कॅरम बोर्ड, थाळीफेक, व तसेच हॉलीबॉल, चेस, रनिंग, कबड्डी, मिक्स रिले, आणि क्रिकेट व बॅडमिंटन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्रा. सायली घाडगे व क्रीडा प्रमुख सहा. प्रा. अमोल राजे शिर्के मंगेश ठसाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.