रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथील शाळा नंबर 21 च्या समोर असलेल्या एका घराला रात्री 9 वाजता आग लागली. आग लागताच घरातील मंडळी बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. ग्रामस्थ आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेचा अग्निशमन दलाशी संपर्क साधून बोलावण्यात आला होता.
घराला शॉर्टसर्किटने आग लागली. घरातील मंडळी लगेचच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मिळेल त्या भांड्यातून पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आगीने रौद्ररूप धारण करताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. अग्निशामनचा बंब घटनास्थळी दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळवले.











