भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंतची महाराष्ट्र शालेय साॅफ्टबाॅल संघात निवड

 

 

दोडामार्ग : प्रतिनिधी :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर आयोजित राज्यस्तरीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा व निवड चाचणीतून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज भेडशी हायस्कूलची विद्यार्थीनी भूमी हनुमंत सावंत हिची महाराष्ट्र राज्य शालेय साॅफ्टबाॅल (१७ वर्षाखालील मुली) संघात निवड झाली आहे.

 

५ ते ९ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा जळगांव येथे संपन्न होणार आहेत. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव तथा प्राचार्य नंदकुमार नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस व जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून भूमी सावंत हिचे अभिनंदन करण्यात आले.