वैभववाडी l प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला जिल्हा कार्यकरणी सदस्यपदी सौ. प्राची प्रफुल्ल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोग अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत श्रीमती रावराणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षा चाकणकर यांनी प्राची रावराणे यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला निरीक्षक दीक्षा दाभोळकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, प्रदेश चिटणीस एम.के. गावडे, सुरेश गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, सर्वेश पावसकर, गणेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.









