Maharashtra Kho-Kho Association Junior-Kishori (Sub-Junior) Group State Championship Tournament to be held in Palghar
मुंबई (क्री. प्र.), महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने २०२३-२४ या वर्षातील किशोर-किशोरी (सब ज्युनियर) गटाची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा पालघरमध्ये होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली. त्याचबरोबर स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य, प्रशिक्षक व फिजिओ यांची सुध्दा नियुक्ती जाहीर केली. साधारणपणे ही स्पर्धा सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता संघटनेकडून व्यक्त केली जागता आहे.
किशोर, किशोरी गटासाठी निवड समिति पुढील प्रमाणे आहे. आशिष पाटील (रायगड), रविकर बागुल (धुळे), अभयकुमार नंदन (संभाजीनगर), श्वेता गवळी (अहमदनगर)
किशोर गटासाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजीओ पुढील प्रमाणे आहेत. किशोर गट- विकास सुर्यवंशी – प्रशिक्षक (संभाजीनगर), राहुल पोळ – सहाय्यक प्रशिक्षक (जळगाव), किशोरी गट : महेंद्र गाढवे – प्रशिक्षक (सातारा), विकास परदेशी – सहाय्यक प्रशिक्षक (अहमदनगर) व फिजीओ -डॉ अमित राव्हाटे (सांगली).











